सातारा : शाहूपुरी परिसरातील समता पार्क येथून १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सावली निलेश साळुंखे असे तिचे नाव आहे. दि. २८ एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेली ही तरुणी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर तिच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
दुसऱ्या घटनेत, जगदंब चौक परिसरातील मुलींच्या वस्तीगृहातून १८ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रद्धा दिलीप चवरे असे तिचे नाव आहे. दि. २२ एप्रिल रोजी दुपारनंतर वस्तीगृहातून बाहेर पडलेली ही विद्यार्थिनी परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही काहीच निष्पन्न न झाल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.