सातारा-कराड येथील सैनिकी वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हंगे

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सातारा व कराड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह तसेच सातारा येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासासोबत शैक्षणिक व करिअर विकासाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी २४ तास अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, वृत्तपत्र सेवा, वाय-फाय सुविधा तसेच खेळाचे मैदान उपलब्ध आहे. याशिवाय नियमितपणे करिअर मार्गदर्शन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, सैन्य भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

सैनिक विधवांच्या पाल्यांना वसतिगृहात पूर्णतः मोफत प्रवेश देण्यात येत असून, सिव्हिलियन विद्यार्थ्यांसाठीही प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सर्व सोयींनी सुसज्ज व सुरक्षित खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा कर्नल हंगे (नि.) यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :

अधीक्षक, सैनिकी मुलांचे वसतिगृह, करंजे नाका, सातारा : ९१३०५३३७९३ / ७०२८१४७०९०

अधीक्षिका, सैनिकी मुलींचे वसतिगृह, करंजे नाका, सातारा : ९९७०३७३१५१ / ८८०५२०५५०५

अधीक्षक, सैनिकी मुलांचे वसतिगृह, विद्यानगर, कराड : ८४४०९८३१११

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पोवई नाका, सातारा : ०२१६२-२३९२९३

ई-मेल : zswo_satara@maharashtra.gov.in


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खरीप २०२६ साठी साताऱ्यात खतांचा मुबलक साठा; टंचाईची शक्यता नाही - कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे

संबंधित बातम्या