आरळे येथे कण्हेर डाव्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू; सातारा तालुक्यातील घटना

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा : तालुक्यातील आरळे येथे कण्हेर डाव्या कालव्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ तारखेला दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रवीण प्रकाश देशमुख (वय ३०, रा. बसपाची वाडी, ता. जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ते कालव्याच्या पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजयोग हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यातील शनिवार पेठेतून दोन महिला बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

संबंधित बातम्या