राजयोग हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा : शहरातील राजयोग हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि २६ रोजी सकाळी ९ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून ही दुचाकी चोरून नेली.

याबाबतची फिर्याद सचिन सदाशिव चौधरी (वय ४४, हॉटेल मॅनेजर, रा. संभाजीनगर ग्रामपंचायत समोर, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी करून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट :कठोर निर्णयांची अंमलबजावणी
पुढील बातमी
आरळे येथे कण्हेर डाव्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू; सातारा तालुक्यातील घटना

संबंधित बातम्या