सातारा : आरळे (ता. जि. सातारा) येथील कॅनॉललगत असलेल्या जुन्या डीपीमधून दि. २१ च्या रात्री सात ते दि. २२ सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान महावितरण कंपनीच्या अंदाजे २८ हजार रुपये किंमतीच्या तार अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
शुभम महेंद्र निकम (वायरमन, रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव) यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. पो. हवालदार गोरे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.