राजेवाडीत शेत जमिनीच्या वाटपावरुन हाणामारी; महिला जखमी, चौघांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा  : राजेवाडी (पो. निगडी, ता. सातारा) येथे शेत जमिनीच्या वाटपाच्या कारणावरुन झालेल्या वादावादीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले, त्यात एक महिला जखमी झाल्याची घटना घडली.

शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मंगल सुधीर भोसले (रा. राजेवाडी, पो. निगडी, ता. जि, सातारा) यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत दिली आहे. त्यावरुन विनोद शंकर जाधव, प्रियांका विनोद जाधव, गंगूबाई शंकर जाधव, मीना रघुनाथ पवार यांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस हवालदार राऊत हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वासोळे येथे घरफोडीत ६५ हजारांचे दागिने लंपास
पुढील बातमी
आरळे येथील डीपीतून २८ हजारांची तांब्याची तार चोरीस

संबंधित बातम्या