सातारा : फलटण येथील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या आमदार निवासस्थान परिसरातील रस्त्यावरुन व्यायामासाठी चालत निघालेल्या वयोवृध्द महिलेला आपण पोलिस असल्याचे सांगून बनावट आयकार्ड दाखवून वयोवृध्द महिलेकडील १ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या तीन बांगड्या हातचलाखीने चोरुन नेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
शोभा विनायकराव खलाटे (वय ७१, गोळीबार मैदान, फलटण) यांनी याबाबत फलटण शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या प्रकरणी अनोळखी दोन इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.