सातारा : सातारा शहरातील एकाने तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित जितेंद्र भोसले (वय २७, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. रोहित भोसले याला दि. ४ जुलै २०२५ रोजी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. मात्र, शनिवारी (दि. २५) तो शिवाजी कॉलेज ते जिल्हा न्यायालय जाणाऱ्या रोडवर एसबीआय बॅंकेसमोर मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार महांगडे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.