सातारा : देगाव येथे कमानीजवळ येथे झाडाझुडपांच्या आडोशाला सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
किशोर जयवंत माने (वय ३८, रा. देगाव, ता. सातारा) याला याप्रकरणी ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. सातारा तालुका पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पोलिस हवालदार किरण यादव हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.