सातारा : सातारा ते कोरेगाव रोडलगत असणाऱ्या संगमनगर येथील कॅनॉल रोडवर अवैध दारु विक्री व वाहतूकप्रकरणी दारु विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी दुपारी सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी ऋषीकेश दिपक शिंदे (वय-२४, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कराड) असे याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी दारुच्या सुमारे दोन हजाराच्या ९० बाटल्या तसेच ५० हजार रुपयांची मोपेड दुचाकी असा एकूण ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली असून पोलिस हवालदार श्री. मोहिते हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.