सातारा : प्रतापसिंहनगरात शनिवारी दुपारी एका तरूणावर सराईत आरोपीने चाकू हल्ला केला. यामध्ये संबंधित तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने प्रतापसिंह नगरात धाव घेऊन संबंधित सराईत आरोपीला ताब्यात घेतले. पैसे न दिल्याने हा हल्ला झाला, असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.