अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

देगावच्या युवकावर सातारा शहर पोलिसांत 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 23 April 2026


सातारा : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस अशोक यादव (रा. देगाव, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

​याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी श्रेयस यादव याने पीडित अल्पवयीन मुलीला दि. ६ मार्च रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरायला नेले होते. यावेळी किल्ल्यावरील मंगळाई देवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या झाडीझुडपांचा आणि निर्जन जागेचा फायदा घेऊन त्याने पीडितेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी १० आठवड्यांची गरोदर असल्याचे तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

​या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली असून, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलिसांनी दि. २१ रोजी संबंधित युवकावर पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर या करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत
पुढील बातमी
कर्जाचा हप्ता थकल्याने महिलेला धमकावणाऱ्या रिकव्हरी एजंटवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

संबंधित बातम्या