अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त धोम डावा कालवा उपविभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६  दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्र.२ अंतर्गत धोम डावा कालवा उपविभाग क्र.५. सातारा यांचे मार्फत जागतिक महिला शेतकरी वर्षा निमित्त पाणी वाचवा या विषयावर महिलांमध्ये जल जागृती करण्यासाठी महिला मेळावा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धक महिलांनी नाव नोंदविण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. अर्चना परशराम रेडेकर कनिष्ठ अभियंता ७०३००४१४५७, सिद्धिका राजेंद्र देवळेकर कनिष्ठ अभियंता ९६६५६२५३३९.

रांगोळी स्पर्धेचा विषय पाणी वाचवा,  जल हे तो कल है , जल ही जीवन हे, सुक्ष्म सिंचन असा आहे. रांगोळी स्पर्धेची वेळ दुपारी ३ वाजता ते दुपारी ४.३० वाजता रांगोळी स्पर्धेचे स्थळ सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा आहे . या स्पर्धेत प्रथम बक्षिस रुपये दोन हजारा एक, आणि ट्रॉफि,  द्वितीय बक्षिस रुपये एक हजार एक आणि ट्रॉफि,  तृतीय बक्षिस रुपये पाचशे एक आणि ट्रॉफि देण्यात येणार आहे 

टिप- स्पर्धकांनी रांगोळी व साहित्य स्वतः आणावे, सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल, शासकिय विभागातील व शासकिय विभागा बाहेरील असे प्रथम ३० स्पर्धकांचे प्रवेश स्विकारले जातील.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी सत्तेचा वापर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; अंगापूर वंदन येथे नागरी सत्कार
पुढील बातमी
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा

संबंधित बातम्या