साताऱ्यात यशवंत उद्यानात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात; फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदनाचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपरिषदेच्या वतीने यशवंत उद्यान येथे अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, विविध सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गायकवाड व संजय गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याच वेळी यशवंत उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक विचारांची जपणूक आणि वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवून देशाला भक्कम संविधान दिले. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.

तसेच नव्याने सुरू झालेल्या साहित्य सदनाच्या माध्यमातून युवकांमध्ये वाचनाची आवड वाढेल व सामाजिक जागृतीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रात्रगस्तीत वनविभागाची कारवाई; खैर लाकूड तस्करीला आळा, केळघरचे दोघे जाळ्यात
पुढील बातमी
सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरळे येथील तिघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या