भरधाव पिकअपची अॅक्टिव्हाला धडक; दोघे जखमी, बोरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

by Team Satara Today | published on : 13 April 2026


सातारा : तालुक्यातील बोरगाव गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडवर अपघाताची घटना दि. १२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या अपघातात अॅक्टिव्हा दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. 

याची फिर्याद ज्ञानेश्वर प्रकाश बोधे (वय २१ रा.भरतगाव) याने दिली असून जगदीश प्रल्हाद साळुंखे (रा.किवळ ता. कराड जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅक्टिव्हा ही गाडी फिर्यादीचा मित्र तेजस चालवत होता, तर त्याच्या मागे फिर्यादी ज्ञानेश्वर बोधे बसलेला होता. ते दोघे सर्व्हिस रोडने जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे, भरधाव वेगात वाहन चालवित अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली.

या अपघातात ज्ञानेश्वर उजव्या हाताला दुखापत झाली असून चालक तेजस शरद कदम (रा. वळसे, ता. जि. सातारा) याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच अॅक्टिव्हा गाडीचे पॅनल चेपून नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात मानसिक आरोग्य पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात; आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण
पुढील बातमी
कोरेगावातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील - पालकमंत्री शंभूराज देसाई; शिवसेना संघटन वाढीसाठी जोर लावणार

संबंधित बातम्या