सातारा : महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेडर, बेरड समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे त्यासाठी राज्यातील समाज बांधव एकसंघ होणे गरजेचे आहे असे आवाहन जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सदाशिव नाईक यांनी केले.
शासकीय विश्रामगृह उमरगा येथे लातूर धाराशिव जिल्ह्यातील बेडर बेरड समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थान वरून श्री सदाशिव नाईक बोलत होते. श्री. नाईक पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये बेडर बेरड जातीचा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेतलेला आहे त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकजुटीने राज्य शासनाला मदत करणे कर्मप्राप्त आहे.
संघाचे जेष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मुगलीकर म्हणाले, कै. डॉ. श्री.भीमराव गस्ती यांचा खरा सामाजिक वारसदार आणि त्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१७ पासून सदाशिव नाईक बेडर बेरड आरक्षणाचा प्रश्न हातात घेऊन समाजाच्या विकासासाठी राज्य शासन दरबारी अहोरात्र प्रयत्न करत आहे. सर्व समाज बांधवांनी श्री नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे लातूर धाराशिव जिल्ह्यातील समाज बांधव उभे आहे असा आवाहन केले.
बेडर बेरड आरक्षण चळवळ महाराष्ट्रामध्ये व्यापक करून राज्य शासनाला सर्व निकषांमध्ये वैद्य ठरण्यासाठी राज्य शासनाला पटवून देऊन आज बेडर बेरड जातीचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा केवळ श्री सदाशिव नाईक यांच्या गेले अनेक वर्षाच्या प्रयत्नामुळे यश प्राप्त झाले आहे तरी सर्व समाज बांधवांनी लातूर किंवा धाराशिवच नव्हे तर संपूर्ण राज्यातील बेडर बेरड समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राज्य शासनाला मदत करण्याचे आव्हान भाजपा लातूर जिल्हा उपाध्यक्ष तथा निलंगा तालुका संजय गांधी निराधार कमिटी अध्यक्ष शेषराव ममाळे याने म्हटले.
कांतराव मंडले, ॲड. राजेंद्र मंडले, गुंडेराव ओकळे, भिमराव सातलगे आणि कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्ण जमादार यांनी केले. आभार श्री गुंडेराव ओकळे यांनी मानले.