यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा परिषदेस भेट

by Team Satara Today | published on : 11 April 2026


सातारा : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ,पुणे येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनियुक्त 85 परिविक्षाधीन अधिकारी यांनी सातारा जिल्हा परिषदेत दि. 9 एप्रिल 2026 रोजी भेट देऊन विविध कामकाजाबाबत व नावीन्यपूर्ण योजनांची माहिती घेतली. 

यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी  नागराजन यांनी सर्व नवनियुक्त परिविक्षाधीन अधिकारी  यांना प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा देऊन सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात  येत असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण योजना तसेच  विविध विकास कामांची अंमलबजावणी करताना राबवण्यात येत असणाऱ्या नवनवीन संकल्पना  व सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवणाऱ्या बाबींबाबत विस्तृत विवेचन केले. 

सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक माहिती,जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, तसेच विविध विभागांच्या योजना याबाबत माहिती, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (सामान्य प्रशासन) निलेश घुले  यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या  लेखाविषयक  कामकाजाबाबत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  राहुल कदम यांनी विस्तृत व मुद्देसूद माहिती सर्व प्रशिक्षणार्थींना दिली तसेच जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा  विभाग असणाऱ्या ग्रामपंचायत विभाग मार्फत चालणाऱ्या विविध योजना,शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना व विविध अभियान त्याचप्रमाणे ग्रामपंचायतशी निगडित सर्व कामकाजाचा विस्तृत आढावा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिला,

 सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असणाऱ्या विविध योजना,उपक्रम व नाविण्यपूर्ण योजनांमुळे सातारा जिल्हा परिषेचा राज्यात व देशात  असणाऱ्या नावलौकिकाबाबत  माहिती मिळाल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थ्यामार्फत समाधान व्यक्त करण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी श्रीमती रेश्मा होजगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  तथा सत्र संचालक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, श्री.शरचंद्र माळी,प्रकल्प उपसंचालक, राग्रावि,यशदा तसेच अक्षय बनसोडे,फॅसिलेटर यशदा हेही उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांकडून पर्दाफाश; आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत; चार संशयित ताब्यात
पुढील बातमी
बहुमत असूनही ‘प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली - पालकमंत्री शंभूराज देसाई ; भाजपवर थेट निशाणा

संबंधित बातम्या