करंडी झरेवाडी येथे विजेचा खांब उभारण्यावरून मारहाण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  : करंडी झरेवाडी, ता. सातारा  येथील उसाच्या शेतात विजेचे खांब उभा करू नको असे सांगितल्याचा राग मनात धरून एकास लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अमोल जाधव यांनी जगन्नाथ जाधव यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत मी येथेच खांब टाकणार आहे.तुला काय करायचे ते कर अस सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केली.  याप्रकरणी जगन्नाथ लक्ष्मण जाधव (वय ४९ रा. झरेवाडी, सध्या रा. अजिंक्य कॉलनी सदर बाजार सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल अशोक जाधव (रा. झरेवाडी करंडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साउंड सिस्टीमवरून वाद; टोळक्यांनी दोघांवर केला चाकू हल्ला; १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यातील सदर बाजार येथील रिमांड होम येथून पाच अल्पवयीन बालकांचे अपहरण

संबंधित बातम्या