सातारा : नवीन एमआयडीसी येथील व्हाईट हाऊस बारमधून बाहेर आल्यावर बाहेर पार्क केलेल्या चार चाकी गाडीचे बंपर कोठे आहे असे विचारल्यावर प्रसाद जाधव (रा, खोकडवाडी) व विनीत कदम (रा. चंदनगर) व त्यांच्या साथीदाराने अमर बापूसाहेब देवगुडे (वय ३०, रा. खोकडवाडी) यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करत दगडाने आणि लाथा भुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. ही घटना दि १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गाडीचे बंपर कोठे आहे विचारत नवीन एमआयडीसीत खोकडवाडीच्या एकाला मारहाण
by Team Satara Today | published on : 20 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026