- सातारा : आपल्या बहिणीशी अभेपुरी, ता. वाई येथील अरुण नामदेव मोहिते याच्यासोबत प्रेमसंबध असल्याच्या संशयातून आरोपी रुपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण याने अरुण मोहिते याच्या डोक्यात कशाने तरी मारुन खून केला होता व त्यांचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. याप्रकरणी वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी रुपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण याला जन्मठेप व 25 हजार दंड आणि 201 कलमाखाली 5 वर्षे शिक्षका आणि मृताच्या आईस 25 हजार रुपये भरपाई देण्याची शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी, दि. 24 जानेवारी 1918 रोजी आरोपी रुपेश चव्हाण याने त्याच्या गावातील अरुण नामदेव मोहिते याच्यासोबत त्याच्या बहिणीचे प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने त्या रागातून अरुण मोहिते यांचा खून केला होता. याबाबत तत्कालीन सपोनि येडगे यांनी आरोपीवर दोषापत्र दाखल केले होते. खटला अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे वाई यांचे न्यायालयात सुनावनी पुर्ण झाला.
सरकार तर्फ अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्री ए.आर. कुलकर्णी यांनी काम पाहीले. सदर केस मध्ये एकुण 14 साक्षीदार तपासले, परिस्थीती जन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे साक्षीवरुन तसेच सरकारी वकील श्री ए. आर. कुलकर्णी यांचा युक्तीवाद व आरोपी यांनी केलेल्या कृत्याबाबत न्यायालयासमोर आलेला पुराव व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य धरुन मा.श्री आर एन मेहरे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश वाई यांनी आरोपींना 302 कलमाखाली जन्मठेप व 25,000/- रुपये दंड 201 कलमाखाली 5 वर्ष शिक्षा व 1000/-दंड या मधील मयताचे आईस 25,000/- रुपये देण्याचे आदेश दिले.