सातारा, दि. ८ : सातारा येथील फर्न हॉटेलसमोर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणिभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पोपट पाटील (रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास त्याच्या ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत धनंजय दिलीप भिसे (रा. आसले, ता. सातारा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. याबाबत त्याचे चुलते विजय जयवंत भिसे (रा. केसरकर पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार पाटोळे करत आहेत.
दुचाकी चालक मृत्यूप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026