सातारा : सातारा पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकार्यांची बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी महेश निलकंठ यादव (रा. सासपडे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. खेड,ता. सातारा येथील गोकर्णनगर बंदिस्त गटर कामाबाबत प्रशांत सत्यवान जाधव यांना कामाचा आदेश व अंदाजपत्रक मागणी पत्र दिले आहे. यावर पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत वसंत फडतरे यांची बनावट सही करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 July 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
युवतीचा विनयभंग प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2026
शिवीगाळ, धक्काबुक्की करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
October 25, 2026
गळफास घेऊन साताऱ्यात एकाची आत्महत्या; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
October 25, 2026