सातारा : सदर बझारमध्ये दोन अज्ञातांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील झेड पी चौक ते कनिष्क हॉल या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन जबदरस्तीने हिसकावून ओढून नेली. चेन स्नॅचिंगच्या या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी उषा बापूसाहेब जाधव (वय 60, रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 3 एप्रिल रोजी घडली आहे. 1 लाख 50 हजार रुपयांची सोन्याची चेन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोयना भागातील वाघणे येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
September 22, 2026
हेळगाव खूनप्रकरणी पाच जणांना अटक; संशयितांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
September 22, 2026
अज्ञात कारने दुचाकीला दिली धडक; अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
September 21, 2026
खोकडवाडी येथील अपघातात एकाचा मृत्यू; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
September 21, 2026