सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरानजीक चारभिंती परिसरातील झुडपांमध्ये गांजा ओढणार्या युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. सदरबझार, सातारा) व सागर संजय वाघ (वय 20, रा. सदरबझार, सातारा) अशी संशयित युवकांची नावे आहेत. सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई दि. 3 मार्च रोजी केली आहे.
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 04 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अपघातात चिमुकल्याचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा
August 14, 2026
गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित!
August 14, 2026