सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील रामकृष्ण कॉलनीतील सिव्हील रस्त्यावरील महाजन आर्थो केअरजवळ असलेल्या कराड अर्बन बँकेजवळून 35 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद डॉ. हर्षद रामदास निकम (34, रा. यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेची नजर; लवकरच विशेष तपासणी मोहीम
August 08, 2026
आजारपणाला कंटाळून शाहूपुरीत एकाची आत्महत्या
August 08, 2026