याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय चंद्रकांत मोरे रा. गोजेगाव ता. सातारा हे त्यांची आई जयश्री मोरे यांना घेऊन मोटरसायकल क्र. एमएच 11 डीक्यू 2825 वरून रहिमतपूर- सातारा रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या हरी मधुकर बर्गे रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा हे चालवीत असलेल्या बलेनो कार क्र. एमएच 11 सीक्यू 7980 ने त्यांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात दत्तात्रय मोरे यांच्या पायास दुखापत झाली असून कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी कार
चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अज्ञात कारने दुचाकीला दिली धडक; अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
September 21, 2026
खोकडवाडी येथील अपघातात एकाचा मृत्यू; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
September 21, 2026