पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे

शरद महाजनी : आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण

by Team Satara Today | published on : 16 January 2025


सातारा : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून पत्रकार क्षेत्रात काम केले. आता नव्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्याचे आणि जोपासण्याचे काम प्रिंट मीडियाला निर्धाराने करावे लागेल. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून वाटचाल करावी. विविध विषयांवर लेखन करताना सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखणी प्रसंगी कठोर व मृदूही झाली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी केले.

महाजनी परिवाराकडून देण्यात येणार्‍या श्रीराम जानकी स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे दै. ‘पुढारी’ सातारा कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, खजिनदार अमित वाघमारे, कार्यकारिणी सदस्य मीना शिंदे, परिवाराचे ऋणानुबंध कायम आहेत. यापुढे पत्रकार दिनी या पुरस्काराचे वितरण केले जाईल. होतकरू पत्रकारांना संघटनात्मक पातळीवर संधी देण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला मिळालेला वसा, वारसा हा सहकार्‍यांनी पुढील पिढीला द्यावा. पत्रकारितेतील नव्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करण्याचे काम यापुढे करत राहू, वृत्तसंपादक हरीष पाटणे तसेच ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांचे पत्रकारितेत काम करताना नेहमीच मार्गदर्शन लाभले. पत्रकारिता ही जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडताना समाजाच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं आहे.पद्माकर सोळवंडे यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मिळालेल्या या पुरस्काराने आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना महाजनी परिवाराकडून देण्यात येणारा श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचलन विठ्ठल हेंद्रे यांनी केले. आभार सागर गुजर यांनी मानले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडमॅप नुसार कामकाज करावे
पुढील बातमी
जिल्ह्यात स्मार्ट स्कूल; आरोग्य केंद्रे उपक्रम सुरूच राहणार

संबंधित बातम्या