सातारा : किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी अडीच ते पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान शाहूपुरी रिक्षा स्टॉप, शाहूपुरी चौक, सातारा येथे नितीन धोंडीराम पवार रा. गेंडामाळ नाका, शाहूपुरी, सातारा यांना लोखंडी रॉड सह काठीने, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केल्याप्रकरणी विष्णू जांभळे, सुरज विष्णू जांभळे दोन्ही रा. आंबेदरे रोड, शाहूपुरी सातारा आणि नरेश धर्मराज जांभळे रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026