सातारा : अज्ञात चोरट्यांनी निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 ते 12 जानेवारी दरम्यान लक्ष्मी नगर, फलटण, ता. फलटण येथील सेवानिवृत्त न्यायाधीश विनायक हरिबा अभंग यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञात चोरट्यांनी कापून घरातील 8 लाख 83 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने, रोख रक्कम तसेच कपडे घरफोडी करून चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.
निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास
by Team Satara Today | published on : 13 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026