सातारा : उंब्रज पोलीस ठाण्यात 25 मे 2016 पासून कर्तव्यास असलेले व सध्या सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर कृष्णाजी आवळे यांच्याविरोधात आरोपीस सहकार्य करण्यासाठी कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक रवींद्र भोरे यांनी फिर्याद दिली. उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास आवळे यांच्याकडे होता. 167/2015 या गुनह्याचा तपास करून ही कागदपत्रे न्यायालयात दाखल करणे अनिवार्य असताना देखील आवळे यांनी ही कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यांना समक्ष तोंडी सूचना देऊन कागदपत्रे हजर करण्यास सांगितले असताना त्यांनी ते टाळून आदेशाचे पालन केले नाही. फिर्यादीला न्याय देण्याचे कर्तव्य असताना त्यांनी आरोपीला सहकार्य व्हावे म्हणून मूळ कागदपत्रे गहाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कागदपत्रे गहाळ करणार्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026