सातारा : विलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलासपुरातील कारंजकर नगर येथे घरफोडी झाली. त्यात अज्ञाताने 20 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. हा प्रकार दि. 27 रोजी घडला. या प्रकणी महेशकुमार पुंडलिक जाधव (वय 62, रा. कारंजकरनगर, विलासपूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026