सातारा : विलासपूर येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 ते 26 दरम्यान गंगाधर कृष्णन नायर रा. विलासपूर, गोडोली, सातारा यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, 18 ग्रॅम वजनाचे लहान मंगळसूत्र, दहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, दहा ग्रॅम वजनाचे गंठण आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले व साखळ्या असा एक लाख 82 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 27 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026