सातारा : जामीन मंजूर करून घेण्यासाठी पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामधील खाजगी इसम किशोर खरात हे मुंबई पोलीस दलामध्ये सहाय्यक फौजदार असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच न्यायाधीश निकम यांच्या सातार्यातील घराची तपासणी करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या वतीने देण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला किशोर खरात हे खाजगी इसम असल्याचे समोर आले होते. मात्र तपासादरम्यान खरात हे मुंबईतील वरळी येथे पोलीस दलात सहाय्यक फौजदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील कारवाई करणार असल्याची माहिती आहे. न्यायाधीश निकम यांच्या सातार्यातील घरातही विभागाने पाहणी केली. मात्र तेथे काही संशयास्पद आढळून आलेले नाही.
लाच प्रकरणातील खाजगी इसम निघाला पोलीस कर्मचारी
न्यायाधीश धनंजय निकम यांच्या घराची तपासणी
by Team Satara Today | published on : 14 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026