सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे ता.सातारा येथून सौ. माधुरी दिगंबर राजगुरु (वय 22, रा.कोंडवे) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 6 डिसेंबर रोजी घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.