सातारा : व्यवस्थापकास शिवीगाळ केल्याप्रकरणी चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रान्सपोर्टचे भाडे घेवून जाण्यासाठी चालकाला ऍडव्हान्स म्हणून पैसे दिल्यानंतर ते वाहन घेवून जाता कामावर न आल्याने मॅनेजरने फोनवरुन त्याबाबत विचारले असता शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी अमिर मोहम्मद शेख (वय 58, रा. मालाड, मुंबई) याच्या विरुध्द विक्रम रणजित यादव (वय 39, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026