सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव ता.सातारा गावच्या हद्दीत अनोळखी चारचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात राजेंद्र नवनाथ कदम (वय 58, रा. चिंचणेर वंदन ता.सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 22 नोव्हेबर रोजी घडली आहे. पायी चालत जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026