सातारा : घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हातउसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या कारणातून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र ढोणे व प्रतीक नलवडे यांच्यासह अनोळखी दोघे (दोघे रा. ढोणे कॉलनी, बोगदा, सातारा) यांच्या विरुध्द शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शौकत जैनुद्दीन बागवान (वय 57, रा.मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 28 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. तक्रारदार यांच्या मुलाने हात उसने पैसे घेतल्याने व ते पैसे परत करत नसल्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 06 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेततत्वावर घेण्याबाबत आवाहन
November 27, 2026
उसने दिलेल्या पैशावरून एकास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
November 27, 2026
खटाव-माणच्या पाण्याला विरोध कराल तर रस्त्यावर उतरू
November 27, 2026
वडूजमध्ये विजेची तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; वडूज परिसरात हळहळ
November 27, 2026