सातारा : जिहे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान राजश्री अरविंद फडतरे मूळ रा. जिहे, ता. सातारा सध्या रा. पनवेल, नवी मुंबई, जि. रायगड यांच्या जिहे येथील राहत्या घराच्या खिडकीच्या स्लाइडिंग विंडोची लोखंडी जाळी कशाने तरी कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे तीन तोळे वजनाचे, एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026