सातारा : मोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजना एकनाथ शिंदे (वय 61, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी सोने खरेदी केल्यानंतर ते पर्समध्ये ठेवले. यामध्ये एकूण 66 हजार 200 रुपयांचे सोन्याचे मणी, चांदीचे पैंजण, मोबाईल, रोख रक्कम याचा समावेश आहे. मात्र मोती चौकातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना दि. 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. मात्र कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर उशीरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मोती चौकातून सोन्याचे दागिने असलेल्या पिशवीची चोरी
by Team Satara Today | published on : 18 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सिव्हिल हॉस्पिटल समोर युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
October 28, 2026
वाईत सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा धुडगूस; सात जणांवर गुन्हे
October 28, 2026
हर्षदा जाधव-देशमुख यांच्या विजयाने साताऱ्यात राष्ट्रवादीचा गुलाल
October 28, 2026
सरस्वती विद्यामंदिरच्या श्रीशा जाधवची तीन सुवर्णपदकांना गवसणी
October 28, 2026