सातारा : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राकेश कृष्णा सोनकांबळे वय 24 राहणार करंजे तालुका सातारा याच्यावर पोक्सोंतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनकांबळे यांनी त्याच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. या प्रकरणाची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे अधिक तपास करत आहेत.
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
by Team Satara Today | published on : 02 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 04, 2026
तीन महिन्यांचा पीओएस डेटा ठेवावा
August 04, 2026
हरवलेले स्मार्टफोन पुन्हा मूळ मालकांच्या हाती
August 04, 2026
यादोगोपाळ पेठेतील पाणीटंचाईवरून नागरिकांचा उद्रेक
August 04, 2026
अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार
August 04, 2026