दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चाद्वारे मतचोरी थांबवणे, एसआयआर प्रक्रिया रोखणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जाणार आहे. राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून या मोर्चाची घोषणा केली. शनिवारी दिल्लीत शांततेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. तरुणांच्या मनात द्वेष किंवा राग नव्हता, तर प्रेमाची भावना होती. तरीही त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला, असं राहुल गांधी म्हणाले.
“शांततेत विरोध करणाऱ्या तरुणांना अशी वागणूक मिळणारा भारत आम्हाला नको आहे. त्यामुळे सोमवारी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात पक्ष, स्त्री-पुरुष, जात, समाज आणि राज्य यांतील भेद बाजूला ठेवून सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र या. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावं. कोणत्याही व्यक्तीची राजकीय विचारधारा काहीही असली, तरी संविधानावर विश्वास असेल तर त्यांनी एकत्र यावे,” असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढल्यानंतर सरन्यायाधीशांना देशाच्या वतीने निवेदन देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या निवेदनातून मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, एसआयआर प्रक्रिया थांबवावी, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यात यावं या मागण्या करण्यात येणार आहे.
आंदोलनातील कारवाईवरूनही पोलिसांवर टीका
शनिवारी दिल्लीत आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरूनही राहुल गांधी यांनी टीका केली. शांततेत आंदोलन करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींची मोठी घोषणा; मतचोरी, एसआयआरविरोधात विरोधकांचा उद्या सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा, सरन्यायाधीशांना निवेदन देणार
by Team Satara Today | published on : 11 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा