दिल्ली : कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना, 'कॉकरोच जनता पार्टी'ने (पुकारलेल्या आंदोलन आज (दि. ११ ऑक्टोबर) सलग दुसर्या दिवशीही कायम राहिले. निदर्शकांनी घोषणाबाजी करत जंतरमंतरच्या दिशेने कूच केले. १०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी अनेक आंदोलकांना ओढत पोलीस बसेसमध्ये चढवले जात असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
राजधानीच्या विविध भागांतून जंतरमंतरकडे कूच करण्याचा प्रयत्न करत असताना CJP च्या समर्थकांसह 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (SFI), 'ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'आणि 'क्रांतिकारी युवा संघटना' यांसारख्या विविध विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. RK आश्रम मेट्रो स्टेशनवर AISA च्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. अनेक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांसह मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
परिस्थिती सध्या नियंत्रणात: DCP सचिन शर्मा
नवी दिल्लीचे DCP सचिन शर्मा यांनी सांगितले की, "परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहोत."
दिल्ली-नोएडा कालिंदी कुंज सीमेवर कडक सुरक्षा
दिल्ली-नोएडा कालिंदी कुंज सीमेवर सुरक्षा व्यवस्था कायम आहे. सीमेवर अजूनही बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या बरोबरीने केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. तथापि, शनिवारच्या तुलनेत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला आहे. सध्या वाहतुकीसाठी केवळ एकच मार्ग (लेन) खुला आहे, तर दोन्ही बाजूंचे मार्ग पूर्णपणे खुले करण्यात आलेले नाहीत. परिणामी, वाहतूक पूर्ववत झाली असली तरी, सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; घोषणाबाजी करत जंतरमंतरच्या दिशेने कूच, १०० हून अधिक जणांना घेतले ताब्यात
by Team Satara Today | published on : 11 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा