दिल्ली : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. "२०२९ च्या निवडणुकीत राहुल गांधी हे केवळ विरोधी पक्षाचा चेहराच नसतील, तर 'इन्शाअल्लाह' ते भारताचे पंतप्रधान असतील," असा ठाम विश्वास त्यांनी मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या
महबूबा मुफ्ती यांच्या या दाव्यानंतर 'इंडिया' आघाडीतील इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. दीपांकर भट्टाचार्य यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, "राहुल गांधी हे विरोधी पक्षाचा चेहरा आहेत की नाही, हा आजच्या बैठकीचा मुद्दा नव्हता. आजच्या बैठकीचा जो मुद्दा होता त्यासंदर्भात राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला आहे, हे सत्य आहे. सध्याचा मुख्य मुद्दा २०२९ चा पंतप्रधान चेहरा नसून, सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना, ज्यांना लोक 'प्रधान निवडणूक अभियुक्त' म्हणत आहेत, त्यांना पदावरून हटवणे हा आहे."
काँग्रेस खासदार सैयद नासिर हुसैन काय म्हणाले -
याशिवाय, काँग्रेस खासदार सैयद नासिर हुसैन यांना विचारले असता, ते म्हणाले, "२०२९ अजून दूर आहे, मात्र राहुल गांधी हेच सध्या आघाडीचे मुख्य नेतृत्व करत आहेत. हे नाकारता येणार नाही. ते रस्त्यावर उतरून लढत आहेत. केंद्र सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करत आहेत. यावरून विरोधी पक्षांचा खरा नेता कोण? हे समजते."
एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२९ च्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला हसत हसत बगल दिली. तर दुसरीकडे महबूबा मुफ्ती यांनी थेट राहुल गांधींच्या पतप्रधान पदासंदर्भात भविष्यवाणीच केली. यामुळे 'इंडिया' आघाडीमध्ये २०२९ च्या नेतृत्वासंदर्भातील प्रश्नावर अद्यापही एकमत नसल्याचे दिसते.
केवळ चेहराच नव्हे, २०२९ मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान होणार; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे मोठं विधान
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा