इराणसोबत शांततेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी धुडकावला, होर्मुझचे नामकरण करून सांगितलं युद्ध पुन्हा कधी सुरू होणार; ट्रम्प यांच्यावर करार मोडल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 26 September 2026


दिल्ली : अमेरिका इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने अमेरिकेसमोर ७ दिवसांचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर काही अटी मान्य झाल्यास हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात येऊ शकते आणि अमेरिकेसोबत अनुकार्यक्रमावर चर्चा सुरू करणे यांचा समावेश आहे.
मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळला. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृतानुसार, ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, नोव्हेंबरमधील अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर बॉम्ब हल्ला पुन्हा सुरू केला पाहिजे. त्यामुळे अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मूझच्या सामुद्रधुनीचा नामकरण देखील केलं आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेसाठी होर्मूझच्या सामुद्रधुनीला आता 'ट्रम्प सामुद्रधुनी' म्हटले जाईल. त्यांनी सोशल मीडियावर या सामुद्रधुनीचा नकाशाही शेअर केला आहे.
गुरुवारी, इराणने युद्ध थांबवण्यासाठी सात दिवसांची योजना सादर केली. यामध्ये संघर्ष थांबवणे, सातव्या दिवशी हॉर्मुझची समुद्रधुनी पुन्हा उघडणे आणि त्यांनतर इराणच्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी पुन्हा सुरू करणे यांचा सामवेश होता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सुरुवातीची काही पावले ४-५ दिवसांत घेतली जातील. सहाव्या दिवशी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल, सातव्या दिवशी अमेरिकेसोबत अणुचर्चा सुरू होईल.
ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणचे अध्यक्ष मसूद पझाश्कियान यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. ते म्हणाले की, जर अमेरिकेने प्रस्ताव स्वीकारला, तर दोन्ही देशांमधील वाटाघाटींची प्रक्रिया त्याच दिवशी सुरू होईल. पझाश्कियान यांनी सध्या दोन्ही देशांमध्ये विश्वासाची कमतरता आहे असे सांगितले. ते न्यूयॉर्कहून तेहरानला रवाना होण्यापूर्वी अमेरिकन वृत्तवाहिनी सीबीएसला त्यांनी सांगितले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझाश्कियान यांनी जूनमधील कराराची अमलबजावणी करण्यात आलेल्या अपयशासाठी ट्रम्प यांना जबाबदार आहे, असे त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, दोन्ही देशांमध्ये एक करार झाला होता. आणि इराण पुढील चर्चेसाठी तयार आहे. त्यांनी दावा केला की, इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली नव्हती तरीही अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेने वाटाघाटीऐवजी लष्करी कारवाईचा मार्ग निवडला. इराणचे सर्वोच नेते, शास्त्रज्ञ, लष्करी कमांडर आणि सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
इराणची लष्करी कारवाईला थांबवण्याची मागणी
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांची जर्मनीमध्ये परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांच्यासोबत भेट झाली. या भेटीदरम्यान अराघची यांनी सांगितले की, वाटाघाटी पुढे नेण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर आपल्या अटी मांडल्या आहेत. या प्रदेशात सुरक्षा पुनर्संचयित करण्यासाठी इराणविरुद्धची अमेरिकेची लष्करी कारवाई थांबली पाहिजे. इराण शांततापूर्ण अणुकार्यक्रमाबाबत चर्चेसाठी तयार आहे. त्यांच्या मते, चर्चेदरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हणाले.
हॉर्मुझ समुद्रधुनी महत्त्वाची का?
हॉर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाची तेल वाहतूक मार्गिका आहे. ही जर बंद राहिली तर जागतिक तेलपुरवठा आणि उर्जा बाजारावर परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढू शकतात. त्यामुळे इराणने हॉर्मुझ समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव अमेरिके पुढे ठेवला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने पुन्हा अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शकता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोळकीत जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; पोटाला गंभीर दुखापत, फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिवेंद्रसिंहराजेंची सावध भूमिका; बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी, चांगली चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे

संबंधित बातम्या