ज्ञानेश कुमार निवडणुका घेत नसून, त्या आधीच ठरवलेल्या आहेत; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप

by Team Satara Today | published on : 23 September 2026


दिल्ली : "ज्ञानेश कुमार हे भारताचे शत्रू आहेत. रिपोर्टनुसार, मतदार याद्यांमधून १२ कोटींपेक्षा जास्त नावे वगळण्यात आली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारास नोंदणीकृत असलेल्या ९७ कोटी मतदारांच्या हे साधारणपणे १२.४ टक्के आहे. भाजपाप्रणीत एनडीए आणि विरोधकांमधील फरक केवळ २ टक्के होता. ज्ञानेश कुमार निवडणुका घेत नसून, त्या आधीच ठरवलेल्या आहेत", असा गंभीर आरोप अभिजीत दीपके याने केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दोन निवडणूक आयुक्तांनीच मनमर्जी कारभार सुरू असल्याचे समोर आणल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे विरोधी पक्षाच्या रडारवर आले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
बिहारपासून सगळ्या निवडणुका रद्द करा
माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष सखोल मतदार पडताळणी हाती घेतल्यानंतर झालेल्या सर्व राज्यातील निवडणुका रद्द करण्यात याव्या अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने एसआयआर सुरू केले होते. त्याचबरोबर ज्ञानेश कुमार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही सिब्बल यांनी केली आहे.    


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा - अरविंद केजरीवाल; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

संबंधित बातम्या