पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीआयवर आकारला जाणारा कर मागे घ्यावा; कर आकारण्याचा निर्णयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल

by Team Satara Today | published on : 16 September 2026


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारनं  यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला आहे. नरेंद्र मोदींनी यूपीआयवर आकारला जाणारा कर मागं घ्यावा, अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचा  उल्लेख केला आहे. राहुल गांधी म्हणतात,'इंदिराजी यांना एकदा विचारलं गेलं की त्यांचा कल कोणत्या बाजूनं आहे, लेफ्ट या राइट यावर इंदिरा गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की त्यांचा कल कोणत्याच बाजूनं नाही, त्यांचा विचार थेट आहे.   
राहुल गांधी यापुढं म्हणाले की मात्र नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना वेगळी आहे. ते ना डाव्या बाजूला आहेत, ना उजव्या बाजूला आहेत. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्कारुन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.  मोदींनी यूपीआयवर टॅक्स लावून आणि अमेरिकेला खूप मोठी रक्कम देऊन भारताच्या प्रत्येक नागरिकावर कर लावला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.  मोदीजी, अमेरिकेसमोर झुकणं बंद करा, धाडस दाखवा, उभं राहा आणि यूपीआय कर मागं घ्या, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारनं UPI Tax मागं घ्यावे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे.मोदी सरकारनं हळूच यूपीआयवर शुल्क लावण्याचा मार्ग खुला केला आहे.  2000 रुपयांच्यावरील मर्चंट यूपीआय व्यवहारांवर एमडीआर लावण्यात येईल. या व्यवहारांची संख्या 5 टक्के असली तरी. यूपीआयच्या व्यवहारांच्या मूल्याच्या 65 टक्के व्यवहार यातीलच आहेत.
सरकार म्हणते ग्राहकांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. मात्र, दुकानदारांवर आकारली जाणारी फी अखेर कोठून येईल. दरांमध्ये वाढवली जाऊन ते शुल्क ग्राहकांकडूनच आकारलं जाईल.  अमेरिकन पेमेंट कंपन्या दीर्घकाळापासून भारताच्या झिरो-एमडीआर धोरणाचा विरोध करत आहेत. आता मोदी सरकारनं बरोबर त्याच दिशेनं धोरण बदलण्याचा मार्ग खुला केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाप्पांच्या आगमनावेळी पालमध्ये दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी, सात जण जखमी

संबंधित बातम्या