शाळांबाबतची मोहिम गुजरातमध्येह राबवण्यात येणार; अभिजीत दीपके यांची नवी रणनीती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by Team Satara Today | published on : 15 September 2026


दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागात असलेल्या सरकारी शाळांमधील दुरवस्था दाखविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही मोहिम राबवण्यात आली आहे. ही मोहिम पंजाब, कर्नाटकातही राबवण्यात आली आहे. आता शाळांबाबतची ही मोहिम गुजरातमध्येह राबवण्यात येणार असल्याचे संकेत अभिजीत दिपके यांनी दिले आहेत.
'ज्या राज्यांबाबत आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते त्या राज्यांमध्ये आम्ही गेलो आहे. पण  आश्चर्य वाटते की, कोणीही गुजरातला भेट देण्यास सांगत नाही, असे विधान अभिजीत दिपके यांनी केले आहे. दीपके म्हणाले, "'तुम्ही पंजाबला का जात नाही?' आम्ही गेलो. 'तुम्ही झारखंडला का जात नाही?' आम्ही गेलो. 'तुम्ही कर्नाटकला का जात नाही?' आम्ही गेलो. अद्याप कोणीही गुजरातबद्दल विचारत नाही हे आश्चर्यकारक आहे." या विधानामुळे आता कॉकरोच जनता पार्टी गुजरातमधील सरकारी शाळांची पाहणी करु शकते, असे बोलले जात आहे.
दीपके आणि त्यांच्या टीमने यापूर्वी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये 'स्कूल ठिक करो' मोहीम राबवली होती. पंजाब आणि विरोधी पक्षांच्या इतर राज्यांमध्ये त्यांनी कमी दौरे केल्याबद्दल सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर, त्यांनी या तीन राज्यांमधील काही शाळांना भेट दिली. सीजेपीच्या पंजाबमधील व्हिडिओबद्दल आणखी प्रश्न निर्माण झाले, यामध्ये 'आप' सरकारच्या एका शाळेचे कौतुक केलेल्या एका मॉडेल स्कूलचा समावेश होता.
भाजपशासित राज्यांमधील मोडकळीस आलेल्या शाळा दाखवून, पंजाबमध्ये केवळ दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या शाळेचचे कौतुक केल्याबद्दल सीजेपीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावर अनेकांनी सीजेपीला आम आदमी पार्टी सरकारची जाहिरात आणि पीआर म्हटले आणि त्यावर टीका केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'स्वाभिमानी'ची २५ वी ऊस परिषद १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणार; संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची घोषणा
पुढील बातमी
NEET-UG परीक्षा आता कम्प्युटर-बेस्ड स्वरूपात घेण्याची तयारी सुरू; NTA प्रमुख अभिषेक सिंग यांची माहिती, परीक्षेचे आधुनिकीकरण आणि कडक सुरक्षा यांचा मेळ घालणार

संबंधित बातम्या