दिल्ली : दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. मलेशियाचे पंतप्रधानही या परिषदेत सहभागी झाले आहेत. आज रविवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली. नाश्त्याच्या वेळी झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.
काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा यांच्या इब्राहिम यांच्यासोबतच्या सकाळच्या नाश्त्याच्या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही बैठक आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्वर इब्राहिम यांच्यात झालेल्या चर्चेनंतर झाली. पीएम मोदी आणि इब्राहिम यांच्यातील चर्चेत व्यापार, सेमीकंडक्टर, पायाभूत सुविधा आणि संरक्षण या क्षेत्रांतील सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. हे दोन्ही नेते ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने भेटले.
पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर मलेशियाच्या पंतप्रधानांनी राहुल गांधींची घेतली भेट; एकत्र नाश्ता करत विविध मुद्द्यांवर चर्चा
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा