नवी दिल्ल, वृत्तसंस्था : भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या 'खगांतक-२४३' या लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्बची (एलआरजीबी) यशस्वी ड्रॉप टेस्ट पार पाडली आहे. भारताच्या अचूक मारा करण्याच्या क्षमतेला बळकट करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या शस्त्रास्त्राची निर्मिती 'जेएसआर डायनॅमिक्स' या भारतीय खासगी संरक्षण कंपनीने केली असून चाचणीदरम्यान सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य झाली आहेत.
खगांतक-२४३ मुळे भारतीय हवाई दलाची 'स्टँड ऑफ स्ट्राईक' क्षमता अधिक सक्षम होणार आहे. ग्लाईड बॉम्ब विमानाने सोडल्यानंतर हवेत प्रवास करत अचूक लक्ष्याचा वेध घेतात. यामुळे लढाऊ विमानांना पारंपरिक ग्रॅव्हिटी बॉम्बच्या तुलनेत शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या टप्प्याबाहेर राहून, सुरक्षित अंतरावरून हल्ला चढवणे शक्य होते. हे बॉम्ब थेट सेवेत दाखल झाले असा नाही, तर शस्त्र प्रणालीच्या क्षमता तपासणीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे. भविष्यात अशा स्वदेशी लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांमुळे सशस्त्र दलांना मोहिमांमध्ये मोठी लवचिकता मिळेल.
भारतीय हवाई दलाकडून स्वदेशी ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी; स्टँड ऑफ स्ट्राईक क्षमतेत वाढ
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा