कवंरपुरा गावातील सरकारी शाळा जमीनदोस्त; ज्यासाठी कॉकरोज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मार खाल्ला होता

by Team Satara Today | published on : 02 September 2026


जयपूर : जयपूरमधील रामपुरा कवंरपुरा गावातील सरकारी शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही तीच शाळा आहे ज्यासाठी कॉकरोज जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कथित ग्रामस्थांचा मार खाल्ला होता. २१ ऑगस्ट रोजी स्कूल ठीक करो या मोहीमेखाली सीजेपीचे कार्यकर्ते हे या शाळेची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथल्या कथित ग्रामस्थांनी या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी सीजेपीचे प्रवक्ते असणाऱ्या आशुतोष रांका यांच्यावर देखील हल्ला झाला होता.

आज ही शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. सरकारने सांगितलं की या ठिकाणी आता १८ लाख रूपयात नवीन इमारत उभारली जाणार आहे. आता कॉकरोज जनता पार्टीने हे त्यांचे यश असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे सह समन्वयक आशुतोष रांका यांनी ही शाळा गोठ्यातून चालवली जात होती असा आरोप केला होता.

रांका यांनी ट्वटि केलं की, 'आमच्या पाहणी दौऱ्यावेळी आमच्यावर दगडफेक करण्यात आली. आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र आता मुलांसाठी चांगली शाळा बांधली जात आहे त्यामुळं हे सर्व फळाला आलं असं म्हणता येईल.'


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत ठाकरे गटाच्या अनेक दाव्यांना प्रत्युत्तर; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
पुढील बातमी
नेपाळमधील भीषण महापुरातील मृतांची संख्या १,००३ वर; अद्याप सुमारे ४,००० नागरिक बेपत्ता, घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले

संबंधित बातम्या